Slide1

कनिष्ठ महाविघायालय ओणी

Slide2

कनिष्ठ महाविघायालय ओणी

Slide3

कनिष्ठ महाविघायालय ओणी

Slide5

कनिष्ठ महाविघायालय ओणी

इव्हेंट

आम्ही सहकार्याने आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये त्यांच्या प्रतिभांचा शोध आणि पोषण करण्यासाठी

तज्ञ प्राध्यापक

आमच्या विद्याशाखा, जगभरातील तज्ज्ञ आहेत, जो सर्व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करतो

उज्ज्वल भविष्य

विविध कोर्स, कार्यक्रम, स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या जागतिक क्षमतेचे आणि कारकिर्दीत वाढ करणे.

पायाभूत सुविधा

ओणी गावाच्या मध्यभागी स्थित, कॅम्पस आपल्या कॅम्पस सुविधा आणि पायाभूत सुविधांसाठी एक आहे

आमच्या विषयी

कनिष्ठ महाविघायालय ओणी

संपूर्ण ग्रामीण भाग, पालक शेतकरी आणि शिक्षणाचा अभाव यामुळे कसेतरी रडतखडत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले म्हणजे प्रचंड शिकलो ही मानसिकता. त्यामुळे दूरवरती जाऊन पुढील शिक्षण घेणे अशक्य कोटीतील गोष्ट. परिणामी मोठ्या संख्येने राहणारा हा बहुजन समाज आणि या बहुजन समाजातील कुले उच्च शिक्षणातून वंचित राहत होती. हे येथील त्यावेळेच्या ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ,ओणी या संस्थेच्या संस्थाचालकांनी हेरले,ओळखले आणि येथील गरीब, शेतकरी पालकांच्या मुलांसाठी सन 1994-1995 या शैक्षणिक वर्षामध्ये कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य) सुरु केले.

हे कनिष्ठ महविद्यालय सुरु करताना संस्थेला शासकीय अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इमारतीचा प्रश्न, विद्यार्थी संख्येचा प्रश्न, दुस-या कॉलेजपासूनचे अंतराचा प्रश्न आणि अनुदान मिळेपर्यंत हे कनिष्ठ महाविद्यालय चालविण्याचा प्रश्न. असे अनेक प्रश्न संस्थेसमोर उभे होते. परंतु सर्व प्रश्न यशस्वीपणे संस्थेने मार्गी लावून आज संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय यशस्वीपणे सुरु आहे. कला-वाणिज्य शाखेबरोबर विज्ञान शाखाही सुरु करण्यात आली. या कनिष्ठ महाविद्यालयाचा फायदा ओणी, कोंडिवळे, खरवते, वडवली,वडदहसोळ, चुनाकोळवण, शिवणे, ओझर, सौंदळ, तिवरे, चिखलगाव, ताम्हाणे या गावातील मुलांना होत आहे. सर्व गावांतील मिळून सुमारे 500 विद्यार्थी-विद्यार्थीनी आज आपले कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत आहेत.

विशेष म्हणजे या कनिष्ठ महाविद्यालयाचा फायदा परिसरातील मुलांप्रमाणेच मुलींनाही मोठ्या प्रमाणात होत असून एकूण विद्यार्थ्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त मुली आहेत. बहुजन समाजातील मुले सुध्दा मोठ्या प्रमाणात आपले उच्च माध्यमिकचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. संस्थेने ज्या उद्देशाने म्हणजे सर्वसामान्य शेतकरी, बहुजन पालकांच्या मुला-मुलींना जवळच उच्च माध्यमिक शिक्षण मिळावे आणि तळागाळातील मुलांनी शिकून आपल्या पायावरती उभी रहावीत व स्वावलंबी बनावीत या उद्देशाने हे कॉलेज सुरु केले आहे. तो उद्देश ख-या अर्थाने यशस्वी होताना पहायला मिळत आहे.

संस्थेच्या मार्फत कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यासाठी सुरुवातील संस्थेचे अध्यक्ष ॲड.वासुदेव तुळसणकर साहेब यांचेबरोबर त्यावेळेचे बांधकाम मंत्री कै. ल.र.हातणकर, बहुजन समाजाचे नेते श्री. चंद्रकांत बावकर, माजी प्राचार्य श्री. शहाजी खानविलकर, संस्थेचे माजी कार्यवाह श्री. रविकांत लिंगायत, डॉ. महेंद्र मोहन आणि संस्थेच्या इतर पदाधिका-यांचा समावेश होता.

संस्थेने कला-वाणिज्य बरोबर विज्ञान शाखा सुरु केल्यामुळे विज्ञान शिक्षण घेणा-या विद्यार्थयािंची आता गैरसोय दूर झाली आहे. संस्थेने या विज्ञान शाखेच्या विद्यार्थयािंसाठी स्वतंत्र सुसज्ज इमारत व सुसज्ज प्रयोगशाळा बांधण्याची स्वप्न उराशी बाळगले असताना संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.प्रदीप संसारे यांच्या प्रयत्नाने श्री. सापळे यांच्याकडून एकूण 63 लाख रुपये एवढी भरीव देणगी संस्थेला प्राप्त झाली असून या देणगीतून स्वतंत्र सुसज्ज वर्गखोल्या व सुसज्ज प्रयोगशाळा बांधली जात आहे

प्राध्यापक वर्ग

कला व वाणिज्य विभाग

 • प्रा. विनोद गंगाराम मिरगुले
 • प्रा. तानाजी भगवान शिंदे
 • प्रा. अप्पासाहेब शिवगोंडा उमराणीकर
 • प्रा. सचिन धाकू जाधव
 • प्रा. विजय संभाजी सावंत
 • प्रा. प्रसाद प्रभाकर मयेकर
 • प्रा. सीया सिध्दविनायक तुळसणकर

 • विज्ञान विभाग

 • प्रा. रेश्मा बळीराम गुरव
 • प्रा. विशाखा बच्छाव
 • प्रा. राजश्री चिंदरकर
 • प्रा. ओंकार सरदेसाई
 • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा प्रथम क्रमांकाचे मानकरी

  1996 दिलिप सखराम दिवाळे 67.00 % कला
  1997 विशाखा कृष्णा भारती 67.83 % कला
  1998 प्रकाश यशवंत नमसले 71.67 % कला
  1999 विनायक सखाराम मटकर 68.50 % कला
  1999 विनायक सखाराम मटकर 68.50 % कला
  2000 महेंद्र हरिश्चंद्र तळेकर 68.50 % कला
  2001 संदीप दत्ताराम चौगुले 75.17 % कला
  2002 ज्योती दगडू कुंभार 75.33 % कला
  2003 प्रितम प्रकाश सुर्वे 70.33 % कला
  2004 विजय सिताराम पालकर 71.17 % कला
  2005 रोहिणी ईश्वर घुले
  कलावती गणपत गोरुले
  76.33 % कला
  2006 गणेश शांताराम माटल
  अनिता यशवंत मासये
  71.17 %
  70.50 %
  कल
  वाणिज्या
  2007 प्रदीप लक्ष्मण पळसमकर
  किरणकुमार शांताराम नेवरेकर
  75.00 %
  82.83 %
  कला
  वाणिज्य
  2008 रेश्मा सखाराम उबाळे
  योगेश सखाराम म्हादये
  80.83 %
  81.67 %
  कला
  वाणिज्य
  2009 संतोष महादेव भिकणे
  सुषमा सुरेश शेडेकर
  79.67 %
  80.67 %
  कला
  वाणिज्य
  2010 प्रमोद धनू दैत
  विश्वदीप रमेश जाधव
  78.83 %
  81.67 %
  कला
  वाणिज्य
  2011 कमलेश झिमाजी कातकर
  सरिता राजाराम तरळ
  76.83 %
  75.83 %
  कला
  वाणिज्य